गेली बरेच वर्षे बाहेर राहत असल्यामुळे इच्छा असो वा नसो, बाहेर खाणं होतंच. त्यामुळे असंच मनात आलं की आपले अनुभव टाकून द्यावेत blog वर, झालाच तर कुणाला फायदा होईल म्हणा :)
बरेच दिवस माझ्या डोक्यात घोळ चालू होता की ही list, area नुसार बनवावी की item नुसार :)
बघू काय होतंय!
मिसळ साठी पुण्यात मला खूप आवडेल असं ठिकाण सापडायचं आहे :) त्यातल्या त्यात बरी ठिकाणे:
ह्याचा एकच negative point म्हणजे रविवारी बंद असते! :-(
South Indian snacks साठी मला विशेष आवडत म्हणजे स्टेशन जवळच 'अक्षय'! त्याशिवाय एफ.सी. रोड वरच 'शर्वरी' आहेच कुठल्याही snacks साठी. अरे हां, 'अभिषेक व्हेज' कस विसरू शकतो मी :) मेहेंदळे गॅरेज समोर आहे. इथला उत्तप्पा खूपच सही होता, आणि इथली कॉफी मला जाम आवडते! कधी जेवायचा योग बाकी आला नाही. :)
कँपात SGS mall च्या समोरच 'Coffee house' चांगलं आहे.
डोश्यासाठी कधीही जायला तयार असं ठिकाण म्हणजे 'मानकर डोसा'! ह्यांच्या २-३ शाखा आहेत. मी करिष्मा सोसायटी च्या इथलाच खाल्ला आहे. सातारा रोडचा बराच प्रसिद्ध आहे.
'स्टिमी अफेअर' मधले इडलीचे नानाविध प्रकार निश्चित ट्राय करण्यासारखे आहेत. (शाखा: संभाजी उद्यान, कर्वे रोड, दुर्गाच्या शेजारी)
वैशाली, रुपाली जरी प्रचंड famous असल तरी मला खूप काही वेगळी टेस्ट वाटली नाही. 'दुर्गा'च पण तसंच, मला इथल्या कोल्ड कॉफीसह काहीच आवडत नाही.
थोडासा वेगळा मेनू try करायचा असेल तर डेक्कनचं 'गुडलक कॅफे' मस्त आहे :) बनमस्का चहा असो किंवा बन आॅमलेट! इथे ब्रेकफास्ट करून बाणेरला ऑफिसला जाणे म्हणजे स्वर्ग होता :D
असंच ब्रेकफास्ट साठी उत्तम ठिकाण म्हणजे लॉ कॉलेज रोडच 'कृष्णा'. 'कोबे सिझलर' च्या समोरच आहे. इकडे दररोज buffet ब्रेकफास्ट पण असतो.
मी 'डांगी पॅटिस' चा उल्लेख केला ना वरती, तर ते off सेनापती बापट रोड आहे :) सिम्बायोसिस कडून चतुःशृंगीला जाताना दुसऱ्या सिग्नलला उजवीकडे दीप बंगला चौकाकडे जो रस्ता जातो तिथे डाव्या हाताला आहे. अस्सल पुणेरी बाणा जपत ठराविक वेळेतच 'माल शिल्लक असेपर्यंतच' पॅटिस मिळतात! पण ते खाल्ल्यानंतर सगळे गुन्हे माफ :) इथले टायमिंग सकाळी ८-१० आणि संध्याकाळी ४-६ आहे. रविवारी फक्त सकाळी.
University साईडला भटकत असाल तर युनिवर्सिटी कॅम्पस मध्ये एक टपरी आहे, तिकडे पण सकाळ संध्याकाळ नाश्ता छान असतो, विशेषतः उपमा. थोडा महाग वाटला मला कॅम्पसच्या मानाने. (मला आठवताहेत सांगलीच्या आमच्या वालचंद कॉलेजच्या बाहेरचे मंजूचे पोहे आणि गणेशची मिसळ! का आठवण काढली, आता तिकडे जावसं वाटतंय! :p )
एवढे सगळे नाश्ता/स्नॅक्स चे प्रकार झाल्यावर भेळ/पाणी-पुरी ला डावलणे कसे शक्य होईल! मला in general पुण्यातील भेळ आवडली नाही. बरीच लोकप्रिय ठिकाणं try करून झाली पण गुण आला नाही :D त्यातला त्यात चांगली भेळ म्हणजे कमला नेहरू पार्कच्या गेटच्या डाव्या हाताला जी गाडी आहे(संगीता भेळ) तिकडे आवडली मला. पाणीपुरी इ. पण चांगले असते. 'मनमीत'(एफ.सी.) ची पाणीपुरी आणि 'बास्केट चाट' लाजवाब असत :)
एम.जी. रोड वर - Marzorin आणि Pasteur. मार्झोरीनला सॅंडविच बेस्ट असतात; Whole wheat variety असते. वरती गॅलरी मध्ये बसून छान TP होतो :p
Pasteur कडे चाट,पाणीपुरी चांगल असत. आणि इथला thick milk shake चक्क खावा लागतो :)
East street cafe ला पण चव चांगली आहे.
तसा मी काही चहाबाज नाही, पण चहासाठी आवडलेलं ठिकाण म्हणजे मोतीबाग तालीम/अहिल्यादेवी शाळेच्या समोरील(शनिवार पेठ) अमृततुल्य! मला सुद्धा चहा प्यायची इच्छा होते तिकडून जाताना :D
अजून बरीच ठिकाणं try करायची आहेत तशी! टिळक रोड(हिराबाग चौक) वर मिळणारा साबुदाणा वडा, SP कॉलेजच्या शेजारची टपरी, प्रभा मधली मिसळ, वहुमन कॅफे आणि खूप काही :) ....
सुरुवात केली लिहायला आणि लक्षात आलं की snacks items वरच खूप मोठी पोस्ट होतेय म्हणून पहिल्या भागात फक्त तेवढच लिहितोय.(किती अंत बघायचा तो वाचणाऱ्यांचा!!! उगाच वाचताहेत म्हणून लिहीतच सुटायचं का :D )
आता इथेच थांबतो! दुसरा भाग लंच/डिनर साठी लवकरच लिहीन! Patience असेल तर भेटूच ;-)

- काटा किर्र: कर्वे रोड वर नळस्टॉप कडून डेक्कन ला जाताना डाव्या हाताला गरवारे कॉलेजच्या समोरच हे टपरी सदृश हॉटेल आहे. नीट पाहिलं नाही तर लक्षात नाही येणार. बऱ्याच ठिकाणी ह्याच कौतुक वाचायला मिळेल. (संध्याकाळी बंद असते) तशी चांगली असते मिसळ. तिखट/मेडियम/लाईट असे ३ प्रकार सर्व प्रकारच्या खवय्यांना आकर्षित करण्यासाठी ठेवले आहेत. मला इथे न आवडणारी गोष्ट म्हणजे 'पाव'! मला मिसळ सोबत 'स्लाईस'च आवडते, आणि इथे कोल्हापुरी मिसळ म्हणून सुद्धा पाव देतात! (हो, कोल्हापूर मध्ये वडा पाव, मिसळ पाव ह्या सोबत 'स्लाईस' दिली जाते, हॉटेल ब्रेड म्हणून लादी मिळते, गोड नसते :) ह्या गोष्टींमध्ये पाव दुय्यम असतो, पुण्या मुंबई मध्ये पावच इतका मोठ्ठा की खरी चव कळत नाही :D )
- रामनाथ: टिळक रोड वर दुर्वांकुर कडून एस.पी. च्या दिशेने थोडस पुढे गेल की डाव्या हातालाच आहे. हॉटेल(!) बघून आत जाण्याच धाडस झालं तर तुम्ही खरे मिसळ प्रेमी! :) Ambience वगैरे गोष्टी बघणार असाल तर इकडे फिरकू नका, पुढे एक पर्याय देईन तुम्हाला :) मस्त तिखट मिसळ असते इथली, आवडली!
- श्रीकृष्ण: तुळशीबागे मध्येच आहे! पण घाबरू नका, अगदी त्या गर्दीत शिरावं नाही लागत म्हणा. शनिपाराकडून(चितळे मिठाई) मंडई कडे जाताना डावीकडे एक बोळ दिसतो, तिथे नजर टाकल्यास बरीच गर्दी दिसेल, मग ओळखायच हे अतृप्त आत्मे श्रीकृष्ण मध्ये मिसळ खाण्यासाठीच थांबले आहेत! मला ह्या पुण्यातील मिसळ च्या चवीबाबत खूप काही सांगण्यासारखं वाटत नाही! ओके असतात.
- श्री उपहारगृह: लक्ष्मी रोड वरून जयहिंद च्या शेजारून जाणाऱ्या वन-वे मधून सरळ १ चौक पुढे गेल की डावीकडे आहे.
- बेडेकर: नारायण पेठ. ह्यांच तर खूप कौतुक ऐकल होत, पण प्रचंड निराशा झाली. माझ्या डोक्यात मिसळ म्हणजे कोल्हापुरी मिसळ, हे फिट्ट आहे, त्यामुळे ही आंबट गोड पुणेरी मिसळ झेपली नाही.
- शर्वरी: एक unusual ठिकाण म्हणजे एफ.सी. रोड वरच शर्वरी(शबरी). घोले रोड च्या कॉर्नरला हे माझे आवडते restaurant आहे. इथल्या सर्वच डिशेस बेस्ट असतात! :) एखाद्या decent ठिकाणी फॅमिली सोबत मिसळ खायची असेल तर उत्तम पर्याय! थोडस महाग आहे इथे, पण overall taste, ambience साठी चालून जात!
- खेड शिवापूर ला कैलास भेळ च्या शेजारी एकदा मिसळ खाल्ली होती! जाळ झाला होता :) परत जायचं राहून गेलंय! भुईंज जवळच 'विरंगुळा' पण सही आहे.