Wednesday, June 9, 2010

मारुतीचा माळ!

शाळेत नसल्यामुळे मे महिन्याच्या सुट्टीचा फील काही आजकाल येत नाही, त्यामुळे १५ दिवसाने परत गावी चक्कर टाकून थोडाफार सुट्टीमय होण्याचा प्रयत्न चालू होता :)
शनिवारी संध्याकाळी माझ्या गावाकडून(बाळेघोल) कापशीला चाललो होतो. हा तसा आमचा नेहमीचा रस्ता. वी ते १० वी ह्याच रस्त्यावरून सायकल भ्रमंती असायची. भ्रमंतीच ती, कारण चालत जाणारे आमच्या आधी शाळेतून घरी पोचायचे :D 
ह्या गावांमध्ये साधारण - कि.मी. अंतर आहे आणि बरोबर मध्यावर एक फोंडा माळ आहे! आणि तिथेच आहे एक छोटेसे मारुतीचे देऊळ. म्हणून त्याला मारुतीचा माळ म्हणतात किंवा मारुतीला 'माळ मारुती' म्हणतात :)

शनिवार असल्यामुळे जाता जाता मंदिराकडे गाडी घेतली. रस्त्यापासून ५० मी अगदी मोकळ मैदान(!) आणि मग मंदिर आहे. ह्या मंदिरा वैशिष्ट्य म्हणजे समोर नंदी आहे, जो सहसा शंकराच्या मंदिरासमोर असतो. तशा ह्या मंदिरा बद्दल अनेक दंतकथा आहेत - उदा. काही चोरांनी एका रात्रीत ते मंदिर बांधले आणि सकाळ झाल्यामुळे कळस राहून गेला . पण दोन्ही गावच्या लोकांसाठी विशेषतः ज्यांच शेत ह्या बाजूला आहे त्यांच्यासाठी हे एक श्रद्धास्थान आहे.
अगदी छोटेखानी गाभारा आहे आणि आत भरपूर तेल, शेंदूर माखलेली मारुतीची साधारण ४-५ फूट उंच दगडातील मूर्ती आहे. गावाकडून येताना खुडून आणलेल्या रुईच्या पानांचे हार शनिवारी हमखास दिसतात. काही वर्षांपूर्वी लोकांनी एकत्र येऊन सभोवताली फारशी आणि कट्टा बांधला आहे.
दर्शन घेऊन बाहेर ह्या कट्ट्यावर विसावलो. साडेसहाचा सुमार असावा. सूर्य मावळतीला गेला होता, संधीप्रकाशात समोरच्या मोकळ्या रानाकडे आणि दूरच्या डोंगराकडे बघायला छान वाटत होत. उजवीकडे काही काळे पांढरे ढग उगाच पावसाची आस लावत होते. आणि त्या सुखद वातावरणात खरी बहार आणली होती ती वाऱ्याच्या सुखद झुळकांनी... मान्सूनपूर्व की काय म्हणतात तसा असेल बहुधा पण उन्हाळा सरत असताना येणाऱ्या त्या वारयाने अक्षरशः मोहरून टाकल होत.
शेतावरून परतणारी अगदी तुरळक माणसं आणि गावाकडे परतणाऱ्या काही मोटारसायकली यांचा अपवाद सोडला तर अगदी निशब्द होत सगळीकडे. आणि त्या नीरव शांततेत इतक प्रसन्न वाटत होत की असच बसून राहावास वाटत होत.
मग शाळेतले दिवस आठवले. शनिवारी इथे आलेली पायी सहल. शेजारच्या चिंचेच्या झाडावर चढून केलेला दंगा. सायकल/बाईक शिकण्यासाठी केलेले खटाटोप. क्रिकेट ची विशेष आवड नसतानाही उगाचच माळावरच्या मॅचेसना लावलेली हजेरी. श्रावणातल्या शेवटच्या शनिवारी इथे खाल्लेला खिरीचा महाप्रसाद. आणि अवकाळी पावसाच्या वेळी उघड्या माळावर ह्या मंदिराने दिलेला आसरा...
खूप आठवणी जोडल्या आहेत ह्या ठिकाणाशी! वाटत होत घरातली सायकल घेऊन परत हायस्कूलला जाव, आणि एकाही चढाला उतरता घरी जाण्याची स्पर्धा लावावी! :)
ती शांतता इतकी मोहक होती की सगळ्या गोष्टींचा विसर पडावा. आणि काही वेळाने उगाच वाटू लागले की अरे आपण तिकडे पुण्यात काय करतोय? तिथे आठवडाभर त्रास घेऊन जर काही हव हवस वाटत असेल तर ही शांतता, हे समाधान... शहरा मध्ये राहून काय कमावतोय आणि काय गमावतोय ह्याचा हिशोब लागत नव्हताकदाचित अनेकांनी सांगितलेले सत्य मला आता गवसत होते - जिथून सुरुवात होते तिथेच परत याव लागत...

असो... शेवटी पूर्ण अंधार पडला, घरी वाट बघत असतील आणि अजून मी कापशीला गेलोच नव्हतो त्यामुळे पाय निघत नव्हता तरी गाडीला किक मारून त्या शांततेचा भंग करावा लागला :(
हा माळ अंधारात सुद्धा खूप छान दिसतो. मागच्या वेळी पहाटे कापशीहून घरी जाताना इतक सुरेख चांदण पडल होत की मला लाईट्स बंद करून गाडी चालवण्याचा मोह आवरता आला नाही :) आजही रात्री परतताना थोडा वेळ थांबून चांदण्या मोजण्याचा प्रयत्न केला आणि मग घरी परतलो, काही रम्य आठवणी सोबत घेऊन...
बघू परत कधी अशी संध्याकाळ अनुभवता येते... श्रावणात मजा येते, सगळीकडे पसरलेली हिरवाई पाहायला. तेव्हा फोटो टाकेनच! :)

4 comments:

Unknown said...

Sachin, you are now a good blogger. After reading this blog, you reminded me of my school days and 6 years of Kapshi High School. Absolutely lost in past :), ani kharach 'Gadya aapala gaon bara!!'

You have well said, I was in Baleghol for 1 week and I felt the same. Parwa Nishad la Patalachya Vihiri war angholi la gheun gelo hoto, tar to mhanato Pappa ha Baleghol cha swimming tank aahe ka? I said 'Yes' but it's free unlike Aundh Swimming Tank,

Jau de, you keep it up, well said well written

Sachin Powar said...

too good :)
'patalancha swimming tank' :D

anyways, thanks for the encouragement :)

Dilip said...

Sachindada tu khupch chan lihtos mala khup awadala ha lekh " marutich mal"
या मारूतीच्या माळावरचा खूप काही आठवणी आहेत . रविवारच्या सुट्टीत अगदी सकाळ पासून कातरवेळ पर्यंत तहान भुकेची पर्वा न करता भर उनामध्ये क्रिकेट खेळण्याचा आनंद वेगळाच होता . त्या श्रावण महिन्यातील मारुतीचा खिरीचा प्रसादाची चव अजूनपर्यंत कुट्च चाकायला मिळाली नाही . त्या मारुतीचा माळावरच्या रम्य आठवणी माजा मनाचा पटलावर अजूनही टवटवीत आहेत .

Unknown said...

i miss it