Tuesday, April 26, 2011

खाण्यासाठी जन्म आपुला :) - भाग १

गेली बरेच वर्षे बाहेर राहत असल्यामुळे इच्छा असो वा नसो, बाहेर खाणं होतंच. त्यामुळे असंच मनात आलं की आपले अनुभव टाकून द्यावेत blog वर, झालाच तर कुणाला फायदा होईल म्हणा :)

बरेच दिवस माझ्या डोक्यात घोळ चालू होता की ही list, area नुसार बनवावी की item नुसार :)

बघू काय होतंय!

मिसळ साठी पुण्यात मला खूप आवडेल असं ठिकाण सापडायचं आहे :) त्यातल्या त्यात बरी ठिकाणे:

  • काटा किर्र: कर्वे रोड वर नळस्टॉप कडून डेक्कन ला जाताना डाव्या हाताला गरवारे कॉलेजच्या समोरच हे टपरी सदृश हॉटेल आहे. नीट पाहिलं नाही तर लक्षात नाही येणार. बऱ्याच ठिकाणी ह्याच कौतुक वाचायला मिळेल. (संध्याकाळी बंद असते) तशी चांगली असते मिसळ. तिखट/मेडियम/लाईट असे ३ प्रकार सर्व प्रकारच्या खवय्यांना आकर्षित करण्यासाठी ठेवले आहेत. मला इथे न आवडणारी गोष्ट म्हणजे 'पाव'! मला मिसळ सोबत 'स्लाईस'च आवडते, आणि इथे कोल्हापुरी मिसळ म्हणून सुद्धा पाव देतात! (हो, कोल्हापूर मध्ये वडा पाव, मिसळ पाव ह्या सोबत 'स्लाईस' दिली जाते, हॉटेल ब्रेड म्हणून लादी मिळते, गोड नसते :) ह्या गोष्टींमध्ये पाव दुय्यम असतो, पुण्या मुंबई मध्ये पावच इतका मोठ्ठा की खरी चव कळत नाही :D )
  • रामनाथ: टिळक रोड वर दुर्वांकुर कडून एस.पी. च्या दिशेने थोडस पुढे गेल की डाव्या हातालाच आहे. हॉटेल(!) बघून आत जाण्याच धाडस झालं तर तुम्ही खरे मिसळ प्रेमी! :) Ambience वगैरे गोष्टी बघणार असाल तर इकडे फिरकू नका, पुढे एक पर्याय देईन तुम्हाला :) मस्त तिखट मिसळ असते इथली, आवडली!
  • श्रीकृष्ण: तुळशीबागे मध्येच आहे! पण घाबरू नका, अगदी त्या गर्दीत शिरावं नाही लागत म्हणा. शनिपाराकडून(चितळे मिठाई) मंडई कडे जाताना डावीकडे एक बोळ दिसतो, तिथे नजर टाकल्यास बरीच गर्दी दिसेल, मग ओळखायच हे अतृप्त आत्मे श्रीकृष्ण मध्ये मिसळ खाण्यासाठीच थांबले आहेत! मला ह्या पुण्यातील मिसळ च्या चवीबाबत खूप काही सांगण्यासारखं वाटत नाही! ओके असतात.
  • श्री उपहारगृह: लक्ष्मी रोड वरून जयहिंद च्या शेजारून जाणाऱ्या वन-वे मधून सरळ १ चौक पुढे गेल की डावीकडे आहे.
  • बेडेकर: नारायण पेठ. ह्यांच तर खूप कौतुक ऐकल होत, पण प्रचंड निराशा झाली. माझ्या डोक्यात मिसळ म्हणजे कोल्हापुरी मिसळ, हे फिट्ट आहे, त्यामुळे ही आंबट गोड पुणेरी मिसळ झेपली नाही.
  • शर्वरी: एक unusual ठिकाण म्हणजे एफ.सी. रोड वरच शर्वरी(शबरी). घोले रोड च्या कॉर्नरला हे माझे आवडते restaurant आहे. इथल्या सर्वच डिशेस बेस्ट असतात! :) एखाद्या decent ठिकाणी फॅमिली सोबत मिसळ खायची असेल तर उत्तम पर्याय! थोडस महाग आहे इथे, पण overall taste, ambience साठी चालून जात!
  • खेड शिवापूर ला कैलास भेळ च्या शेजारी एकदा मिसळ खाल्ली होती! जाळ झाला होता :) परत जायचं राहून गेलंय! भुईंज जवळच 'विरंगुळा' पण सही आहे.
माझा सगळ्यात आवडता खाद्यप्रकार; कधीही खाऊ शकणारा म्हणजे 'पोहे'! पुण्यातले एक नंबर पोहे 'बिपीन स्नॅक्स' कडेच! कर्वे रोड डेक्कन साईडला जिकडे संपतो तिकडे सह्याद्री हॉस्पिटल च्या शेजारी ही टपरी आहे. इथे जाऊन फक्त १ डिश खाऊन आलात तर तुम्ही खवय्ये सोडाच, माणूस'प्राणी' पण नाहीत :D इथले सर्व प्रकार अप्रतिम असतात - वडा चटणी(पाव मला आवडत नाही ना ;-) पण छान असतो वडा पाव सुद्धा), उपमा, शिरा, साबुदाणा खिचडी(काकडी), ब्रेड पॅटिस(पण पॅटिस साठी ह्याच्यापेक्षा भारी एक ठिकाण आहे - डांगी पॅटिस!). Business policy म्हणा की अजून काही, इथल्या प्लेट्स अशा आहेत की एका प्लेट ने तुमची फक्त भूक चाळवली जाते, आणि आपसूक तुम्ही पुढची प्लेट मागवता!
ह्याचा एकच negative point म्हणजे रविवारी बंद असते! :-(

South Indian snacks साठी मला विशेष आवडत म्हणजे स्टेशन जवळच 'अक्षय'! त्याशिवाय
एफ.सी. रोड वरच 'शर्वरी' आहेच कुठल्याही snacks साठी. अरे हां, 'अभिषेक व्हेज' कस विसरू शकतो मी :) मेहेंदळे गॅरेज समोर आहे. इथला उत्तप्पा खूपच सही होता, आणि इथली कॉफी मला जाम आवडते! कधी जेवायचा योग बाकी आला नाही. :)
कँपात SGS mall च्या समोरच 'Coffee house' चांगलं आहे.
डोश्यासाठी कधीही जायला तयार असं ठिकाण म्हणजे 'मानकर डोसा'! ह्यांच्या २-३ शाखा आहेत. मी करिष्मा सोसायटी च्या इथलाच खाल्ला आहे. सातारा रोडचा बराच प्रसिद्ध आहे.
'स्टिमी अफेअर'
मधले इडलीचे नानाविध प्रकार निश्चित ट्राय करण्यासारखे आहेत. (शाखा: संभाजी उद्यान, कर्वे रोड, दुर्गाच्या शेजारी)
 
वैशाली, रुपाली जरी प्रचंड famous असल तरी मला खूप काही वेगळी टेस्ट वाटली नाही. 'दुर्गा'च पण तसंच, मला इथल्या कोल्ड कॉफीसह काहीच आवडत नाही.

थोडासा वेगळा मेनू try करायचा असेल तर डेक्कनचं 'गुडलक कॅफे' मस्त आहे :) बनमस्का चहा असो किंवा बन आॅमलेट! इथे ब्रेकफास्ट करून बाणेरला ऑफिसला जाणे म्हणजे स्वर्ग होता :D
असंच ब्रेकफास्ट साठी उत्तम ठिकाण म्हणजे लॉ कॉलेज रोडच 'कृष्णा'. 'कोबे सिझलर' च्या समोरच आहे. इकडे दररोज buffet ब्रेकफास्ट पण असतो.


मी 'डांगी
पॅटिस' चा उल्लेख केला ना वरती, तर ते off सेनापती बापट रोड आहे :) सिम्बायोसिस कडून चतुःशृंगीला जाताना दुसऱ्या सिग्नलला उजवीकडे दीप बंगला चौकाकडे जो रस्ता जातो तिथे डाव्या हाताला आहे. अस्सल पुणेरी बाणा जपत ठराविक वेळेतच 'माल शिल्लक असेपर्यंतच' पॅटिस मिळतात! पण ते खाल्ल्यानंतर सगळे गुन्हे माफ :) इथले टायमिंग सकाळी ८-१० आणि संध्याकाळी ४-६ आहे. रविवारी फक्त सकाळी.

University साईडला भटकत असाल तर युनिवर्सिटी कॅम्पस मध्ये एक टपरी आहे, तिकडे पण सकाळ संध्याकाळ नाश्ता छान असतो, विशेषतः उपमा. थोडा महाग वाटला मला कॅम्पसच्या मानाने. (मला आठवताहेत सांगलीच्या आमच्या वालचंद कॉलेजच्या बाहेरचे मंजूचे पोहे आणि गणेशची मिसळ! का आठवण काढली, आता तिकडे जावसं वाटतंय! :p )

एवढे सगळे नाश्ता/
स्नॅक्स चे प्रकार झाल्यावर भेळ/पाणी-पुरी ला डावलणे कसे शक्य होईल! मला in general पुण्यातील भेळ आवडली नाही. बरीच लोकप्रिय ठिकाणं try करून झाली पण गुण आला नाही :D त्यातला त्यात चांगली भेळ म्हणजे कमला नेहरू पार्कच्या गेटच्या डाव्या हाताला जी गाडी आहे(संगीता भेळ) तिकडे आवडली मला. पाणीपुरी इ. पण चांगले असते. 'मनमीत'(एफ.सी.) ची पाणीपुरी आणि 'बास्केट चाट' लाजवाब असत :)
एम.जी. रोड वर - Marzorin आणि Pasteur.
मार्झोरीनला सॅंडविच बेस्ट असतात; Whole wheat variety असते. वरती गॅलरी मध्ये बसून छान TP होतो :p
Pasteur कडे चाट,पाणीपुरी चांगल असत. आणि इथला thick milk shake चक्क खावा लागतो :)
East street cafe ला पण चव चांगली आहे.

तसा मी काही चहाबाज नाही, पण चहासाठी आवडलेलं ठिकाण म्हणजे मोतीबाग तालीम/अहिल्यादेवी शाळेच्या समोरील(शनिवार पेठ) अमृततुल्य! मला सुद्धा चहा प्यायची इच्छा होते तिकडून जाताना :D

अजून बरीच ठिकाणं try करायची आहेत तशी! टिळक रोड(हिराबाग चौक) वर मिळणारा साबुदाणा वडा, SP कॉलेजच्या शेजारची टपरी, प्रभा मधली मिसळ, वहुमन कॅफे आणि खूप काही :) ....
सुरुवात केली लिहायला आणि लक्षात आलं की snacks items वर खूप मोठी पोस्ट होतेय म्हणून पहिल्या भागात फक्त तेवढच लिहितोय.(किती अंत बघायचा तो वाचणाऱ्यांचा!!! उगाच वाचताहेत म्हणून लिहीतच सुटायचं का :D )
आता इथेच थांबतो! दुसरा भाग लंच/डिनर साठी लवकरच लिहीन! Patience असेल तर भेटूच ;-)

13 comments:

dhananjay said...

तुमचा माहिती देण्याचा प्रयत्न चांगला आहे.पण एक संकेतस्थळ सुचवितो , त्याला अवश्य भेट द्या.
धनंजय मांडळकर
dhananjay mandalkar
http://puneonaplate.com/

Unknown said...

Uttam ahe. Kahi thikani jave lagnar ahe he kalale :D

Unknown said...

f.c road var d. paduka chowkamadhe sweet chariot cafe chi cappuccino try karun bagh chan aahe....

Nitesh said...

Mastach. Asa lakshat ala ki baryach thikani ajun geloch nahiye. :)

Sachin Powar said...

Thanks all for the comments :)
@Dhananjay: good site!
@Ajay: will definitely try it.

Ranjit said...

Consider adding these places on Google Map. People having smartphones will benefit tremendously. Localites as well as visitors. Also, add a link to this blog when you add the places.

AMOL said...

Ek number bhava...
Ya madhil Ramnath try kelele ahe.

Tya chavichi parat aathavan zali

Sachin Powar said...

Thanks Amol!
@LS: yes, nice idea! will do it incrementally :)

Pankaj said...

Ek number bhava ....
Hyderabad madhe asayala pahije hotas ... bara zala asata...

Sachin Powar said...

Bhawa,
I miss all the fun we had @ Hyderabad :)
It was Christmas 2006!

Authentic spicy Andhra chicken and THE Biryani!
Not to forget the famous cookies(Paradise??)

and the eat street on the banks of Hussain sagar!

I am coming :p

धनंजय मांडळकर said...

fergusson रस्त्यावर वैशालीच्या च्या थोडे पुढे 'कढाई' नावाचे एक हॉटेल आहे. तिथे बरेच काही मिळते ,खास करून उत्तर भारतीय पद्धतीचे पदार्थ चांगले आहेत. मला छोले भटोरे (मुख्य समस्या : दोन खूप मोठे भटोरे आणि त्याला अजिबात न पुरणारे छोले,त्यामुळे छोले पुरवून खावे लागते ) आणि मुख्यकरून जिलेबी+रबडी हा वैशिष्टपूर्ण प्रकार फार आवडला. काही जणांना हे मिश्रण फार गोड वाटण्याची शक्यता आहे.बाकी चाट चे प्रकार आपल्या समोर बनवत असल्या मुळे स्वच्छते वर विश्वास ठेवता येतो.
धनंजय मांडळकर

Sachin Powar said...

@धनंजय: thanks for the info. aaj fakt baghun aalo 'kadhaai' kuthe aahe te :) lawkarach bhet dein!

Anonymous said...

Powar saheb..as usual Rocks..!! Very good observation...!!!

Amar